सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे (मूळ रा. मारुल, ता.कराड, सातारा) हे गायब झाल्याने महाराष्ट्र पोलिस दल हादरुन गेला. अखेर १३ दिवसानंतर बेशुध्द अवस्थेत शिरवळ येथे सापडले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जालना एसीबीत ते कर्तव्य बजावत असताना त्यांना २० दिवसांपूर्वीच प्रमोशन मिळाले आहे. त्यानुसार त्यांची कोकणात बदली झाली होती. याच दरम्यान दि. ३ फेब्रुवारी रोजी ते जालना येथील घरात मोबाईल, वाहन, पाकीट, घड्याळ अशा वस्तू ठेवून घरातून बाहेर पडले होते. बराचवेळ झाल्यानंतर संग्राम ताटे हे परत न आल्याने त्यांच्या पत्नीने शोधाशोध केली. पती सापडत नसल्याने बेपत्ता असल्याची नोंद जालना पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी तपासाची पराकाष्टा केली. मात्र, तरीही पोलिसांना ते सापडत नव्हते. अखेर ते १३ दिवसानंतर बेशुध्द अवस्थेत शिरवळ येथे सापडले.
You must be logged in to post a comment.