मुंबई, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा स्विकारला आहे. दरम्यान, भाजपच्या दबावापुढे संजय राठोड यांना राजीनामा दिला असून त्यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला मोठा झटका मानला जात आहे.
रविवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला. ‘मी राजीनामा देतो पण चौकशी पुर्ण होऊ द्यात. त्यात मी दोषी आढळलो तर माझा राजीनामा मंजुर करा.’ अशी विनंती राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यावेळी संजय राठोड प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर राजीनामा घ्यावा अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी केली होती. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम होते, अखेर त्यांनी संजय राठोड यांचा स्वीकारला आहे.
पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यातील संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे भाजपने संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. सोमवार पासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भाजपने दिला होता. त्यामुळे खुद्द राठोड यांनीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिला तो स्वीकारला आहे.
दरम्यान, मुख्यंत्र्यांकडे राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड पत्रकारांशी बोलतांना म्हणाले , मी मुख्यमत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. मात्र माझं राजकीय, सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपने केला. याप्रकरणी माझी आणि माझ्या समाजाची बदनामी झाली.माझी बदनामी करण्यासाठी विरोधकांनी अत्यंत घाणेरडं राजकारण केलं.याप्रकरणी निष्पक्ष तपास झाला पाहिजे. मी मंत्रिपदापासून दूर राहून चौकशीला सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
You must be logged in to post a comment.