पैशासाठी सहकारमंत्र्याच्या विवाहित पुतणीचा काँग्रेस आमदाराकडून छळ

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पैशांसाठी सुनेचा छळ केल्याप्रकरणी कोल्हापूरतील काँग्रेसचे आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी. एन. पाटील यांच्यासह त्यांची मुलगा राजेश, मुलगी सौ. टिना महेश पाटील (रा. कऱ्हाड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याबाबत सौ. आदिती राजेश पाटील (सध्या. रा. कऱ्हाड) यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

सौ. आदिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची पुतणी तर येथील ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आदितीला शिवीगाळ करून मारहाण करत  पी. एन. पाटील, पती राजेश, व नंदन टिना यांनी एक कोटीची मागणी केली. यासाठी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला आहे.

error: Content is protected !!