सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे हीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका केली आहे. केतकीने तिच्या फेसबूकवर एका व्यक्तीची कविता शेअर करत पवारांवर निशाणा साधला आहे. केतकीच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटलं आहे. यानंतर आता साताऱ्यात राष्ट्रवादीच्या पदधिकऱ्यांनी केतकीच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने तिला अटक होण्याची शक्यता आहे.
केतकी चितळेने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये शरद पवारांवर अत्यंत वाईट भाषेत टीका केली. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केल्याने केतकी विरोधात कळवा पोलीस ठाण्यामध्ये कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी समिंद्रा जाधव यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर साताऱ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सातारा येथील सायबर सेलला तक्रार दाखल करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट तसेच संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची छेडछाड केल्याप्रकरणी लवकर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई झाली आहे
You must be logged in to post a comment.