समर्थगाव येथील कंपनीस भीषण आग

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : समर्थगाव, अतीत ता.सातारा येथे भंगारातील प्लास्टिकचे रिसायकलिंग करणाऱ्या कंपनीस रविवारी दुपारी भीषण आग लागली. सुदैवाने कामगारांना सुट्टी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या चार गाड्यांनी रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र आगीने रौद्ररूप घेतल्याने कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, महामार्गावरील निसराळे फाटा येथून पाली- सासपडेकडे जाणाऱ्या रस्त्यावर समर्थगाव (अतीत) आहे. या गावातील डोंगराच्या पायथ्याला अमेझिया व्हिजन इन्व्हायरमेंटल या नावाची कंपनी आहे. या कंपनीत भंगारातील प्लास्टिकवर रिसायकलिंग करण्याचा प्लान्ट आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास या कंपनीला अचानक आग लागली. रविवार कामगारांना सुट्टी असल्याने कंपनीत कोणीही नव्हते. त्यामुळे आग लागलेली लवकर कोणाच्याही लक्षात आले नाही. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले

error: Content is protected !!