सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : दहिवडी नगरपंचायतीच्या कार्यालयाला रविवारी सकाळी ९-३० च्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये काही कागदपत्रे, काॕम्प्युटर, झेराॅक्स मशीन, फर्निचर असे एकूण १० लाख रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, आज रविवारी सुट्टी असल्याने आॕफीस बंद होते. शाॅकसर्कीटमुळे सकाळी ९-३० च्या सुमारास कार्यालयात आग लागली. काही वेळातच कार्यालयातून धूर येऊ लागला. नागरिकांनी धाव घेत वीज पुरवठा खंडीत केला. त्यानंतर पाण्याने आग विझविण्यात आली. काही वेळात आग आटोक्यात आली. या घटनेनंतर दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, नगरपंचायतीचे अधिक्षक निकम, नगराध्यक्ष धनाजी जाधव, उपनगराध्यक्ष निलम शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात नगरपंचायतीचे कामगार पिसाळ यांनी तक्रार दिली आहे.
You must be logged in to post a comment.