सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शाहूपुरी येथील मिरचीच्या गोदामाला रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत मिरची माल जळून खाक झाला. सातारा नगरपालिकेच्या अग्नीशामक दलाने केलेल्या प्रयत्नांमुळे अवघ्या अर्धा तासात आग आटोक्यात आली.
याबाबत माहिती अशी की, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या परिसरात कच्छी ट्रेडर्स यांचे गोदाम आहे. रविवारी सकाळ दहा वाजण्याच्या सुमारास अचानक गोदामाला आग लागली. या आगीत गोदाममध्ये असलेल्या मिरच्या जळू लागल्या. त्यामुळे निर्माण होणाऱ्या धूरामुळे परिसरात लोकांना मिरचीचा ठसका लागला. काही वेळातच नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, सातारा नगर पालिकेच्या अग्निशामक दलाने धाव घेऊन आग विझविण्यास सुरुवात केली. काही वेळात आग आटोक्यात आली. या आगीत कोणत्याही स्वरुपाची जीवित हानी झाली. मात्र, गोदाममध्य़े असलेला माल जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.
You must be logged in to post a comment.