वाई,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाईच्या न्यायालय परिसरात आज सोमवार दुपारी अटकेत असलेल्या तीन गुंडांवर गोळीबार करण्यात आला. संबंधीत गोळीबार करून फरार झाले असून वाई शहरात मध्यवस्तीत घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.घटनेनंतर पाेलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. दरम्यान ,गोळीबाराच्या घटनेने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (रा- भुईंज) आणि निखिल माेरे व अभिजीत शिवाजी मोरे (रा- गंगापुरी, वाई) यांच्यावर आज वाई न्यायालय परिसरात गोळीबार झाला. या तिघांना मेणवली (ता. वाई) येथील हॉटेल व्यावसायिकाला दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून दरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी कळंबा कारागृहातून नुकतीच अटक केली होती.त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.या घटनेनंतर न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला.सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही.
You must be logged in to post a comment.