सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : खटाव तालुक्यातील औंध येथून पाच संशयित आराेपींनी आज पहाटे पाेलीस ठाण्यातून धूम ठाेकली आहे. दरम्यान माजी कृषिमंत्री खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक मातब्बर सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना ही घटना घडल्याने पाेलीस दलावर नामुष्की ओढावली आहे.
औंध, उंब्रज, वडूज येथील विविध गुन्ह्यात तसेच ३९५ कलम (दरोडा) अंतर्गत गुन्ह्यात पाच संशयित आराेपींना ताब्यात घेण्यात आले हाेते. हे पाच संशयित आराेपी पहाटे पोलीस ठाण्यातून पळाले आहेत. एकाच कोठडीत पाच जणांना ठेवले हाेते. त्यांनी कोठडीचा दरवाजा तोडून पलायन केल्याचे समजते. दरम्यान यावेळी पोलिसांना मारहाण झाल्याची चर्चा ? रंगली आहे.
You must be logged in to post a comment.