पुसेगाव येथील शाळेमध्ये पाच विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुसेगाव ता खटाव येथील एका हायस्कूलमध्ये दि. १३ रोजी एक विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर लगेचच शासनाच्या आदेशानुसार  विद्यालयाला बंद करण्यात आले.  सर्व मुलांची आरटीपीसीआर टेस्ट करून घेण्यात आली आहे. त्यामध्ये शाळेतील ५ विद्यार्थी  कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत . 

नेर मधील दोन तर पुसेगावातील तीन विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे.या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य दोन विद्यार्थी हाय रिस्क आहेत.  पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या कोविड केअर सेंटर मद्ये शाळेच्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांची आर टी पी सी आर टेस्ट घेण्यात येत आहे. दररोज सुमारे १००  विद्यार्थ्यांची टेस्ट होत आहे.त्यात पाच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडले तर सर्व शिक्षकांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.  काही विद्यार्थ्यांनी ही टेस्ट  अद्याप पर्यंत केलेली नाही. 

इयत्ता ५ वी ते १० वी या वर्गातील अशा विद्यार्थ्यांची शाळेमार्फत सोमवार दिनांक २२ रोजी  सकाळी साडे नऊ ते साडे अकरा यावेळेत पुसेगाव प्रा.आरोग्य केंद्रांमधून आरटीपीसीआर टेस्ट करून मिळेल. त्यानंतर टेस्ट करून घ्यावयाची झाल्यास पालकांना ती स्वत:च्या जबाबदारीवर  करून घ्यावी लागणार आहे

error: Content is protected !!