सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जावळी तालुक्यातील सनपाने गावातील विद्यार्थ्याने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. ओंकार पवार याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये झेंडा फडकवला आहे. ओंकारने देशात १९४ वा क्रमांक पटकवला.
ओंकार पवार याचे प्राथमिक शिक्षण हे सनपानेच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले होते. तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत झाले. ओंकार पवार मागील वर्षी यूपीएससी परीक्षेत 455 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. त्यानंतर तो आयपीएस पदावर सध्या रुजू आहे.
गेल्या दोन वर्षात ओंकारने गावात राहूनच यूपीएससीची सर्व तयारी केली आहे. अतिशय सामान्य कुटुंबातील असलेल्या ओंकारचे आई-वडील शेती करतात. तो घरातील पहिला अधिकारी झाल्यामुळे संपूर्ण घरात आणि गावात सध्या उत्साहाचे वातावरण आहे.
You must be logged in to post a comment.