सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सुर्ली ता. कराड येथील एका फूड कंपनीला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ परसले होते. अग्निशामन दलाच्या मदतीने कामगारांनी आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.
सुर्ली येथील टेस्टल फाईन फूड प्राईवेट लिमिटेड या कंपनीत शुक्रवार दिनांक १६/४/२००१ रोजी सायंकाळी ६.४० वाजण्याच्या सुमारास डिझेल जनरेटर मध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत लाखोच्या मशिनरी जळून खाक झाल्या.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी कराड येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. कंपनीतील कामगार, व्यवस्थापकीय सदस्य व कराड येथील अग्निशमन दल यांच्या मदतीने रात्री आठच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
You must be logged in to post a comment.