सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खिंगर, ता. महाबळेश्वर गावच्या पाणी पुरवठा योजनेसाठी आमदार मकरंद पाटील यांच्या निधीतून ६८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती खिंगर गावचे उपसरपंच विठ्ठल दुधाने व माजी सरपंच अशोक दुधाने यांनी दिली.
महाबळेश्वर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आ. मकरंद पाटील यांनी विशेष लक्ष पुरवले असून खिंगर गावात अलीकडे वाढत्या लोकसंख्येने पिण्याच्या पाण्याची चणचण भासत होती उन्हाळ्यात तर गावाला टँकरची मागणी होत आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी गावासाठी नवीन पाणी योजना करण्यासाठी प्रस्ताव मागवून घेतला होता. तो त्यांनी आमदार पाटील यांना सादर केला होता. त्यानुसार आ. पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत खिंगर गावात नवी विहीर, साठवण टाकी आणि अंतर्गत पाईप लाइन करण्यासाठी तब्बल ६८ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे यावेळी विठ्ठल दुधाने यांनी दिली.
यावेळी सरपंच दिनकर मोरे, उपसरपंच विठ्ठल दुधाने, शशिकांत भिलारे, नितीन दुधाने,संतोष पवार, छाया दुधाने, रवींद्र पवार उपस्थित होते.
याबद्दल आ. पाटील यांचे गावचे ग्रामस्थ, महिला व युवक यांनी आभार मानले आहेत.पांचगणी न्यूज नेटवर्कपांचगणी : खिंगर गावच्या पाणी पुरवठा योजनेसाठी आमदार मकरंद पाटील यांच्या निधीतून ६८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती खिंगर गावचे उपसरपंच विठ्ठल दुधाने व माजी सरपंच अशोक दुधाने यांनी दिली.महाबळेश्वर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आ. मकरंद पाटील यांनी विशेष लक्ष पुरवले असून खिंगर गावात अलीकडे वाढत्या लोकसंख्येने पिण्याच्या पाण्याची चणचण भासत होती उन्हाळ्यात तर गावाला टँकरची मागणी होत आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी गावासाठी नवीन पाणी योजना करण्यासाठी प्रस्ताव मागवून घेतला होता. तो त्यांनी आमदार पाटील यांना सादर केला होता. त्यानुसार आ. पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत खिंगर गावात नवी विहीर, साठवण टाकी आणि अंतर्गत पाईप लाइन करण्यासाठी तब्बल ६८ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे यावेळी विठ्ठल दुधाने यांनी दिली.यावेळी सरपंच दिनकर मोरे, उपसरपंच विठ्ठल दुधाने, शशिकांत भिलारे, नितीन दुधाने,संतोष पवार, छाया दुधाने, रवींद्र पवार उपस्थित होते.याबद्दल आ. पाटील यांचे गावचे ग्रामस्थ, महिला व युवक यांनी आभार मानले आहेत.
You must be logged in to post a comment.