(सातारा, भूमिशिल्प वृत्तसेवा) – वाई शहरालगत असणाऱ्या उच्चभ्रू नंदनवन पार्कमधील विष्णू श्री स्मृती रो हाऊसमध्ये जर्मनीचे दोन विद्यार्थी गांजाची शेती करताना आढळले. सातारा पोलिसांनी त्यावर धाड टाकली. दोन विदेशी तरुण न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी मंगळवारी सातारा कारागृहातच नग्न अवस्थेत धिंगाणा घातला.
याबाबत माहिती अशी की, वाई शहरालगत असलेल्या नंदनवन पार्कमधील एका रो हाऊसमध्ये जर्मन नागरीक सर्गीस व्हिक्टर मानका (वय ३१) व सेबेस्टीन स्टेन मुलर (वय २५) हे दोघे घराच्या आवारात गंजाची शेती करीत असल्याचे आढळून आले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दोघांनी सातारा येथील कारागृहातील १५ नंबरच्या खोलीत नग्न अवस्थेत धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. दोघांनी शौचालय आणि सीसीटिव्ही कॅमेराची तोडफोड केली. त्यांना रोखण्यासाठी गेलेले कारागृह कर्मचारी संदीप फाळके आणि रमेश ओव्हाळ यांनाही धक्काबुकी केली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
You must be logged in to post a comment.