सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जांबळेवाडी (कण्हेर) ता सातारा येथे वन्यप्राणी चौसिंगाच्या शिकार प्रकरणी सातारा वनविभागाने तातडीची हालचाल करत दोघांना रंगेहात अटक केली असून जखमी अवस्थेतील चौसिंगा ताब्यात घेतला आहे
या बाबत मिळालेल्या माहिती प्रमाणे सातारा वनपरिक्षेत्रात वन्यप्राणी चौसिंगाची शिकार झाल्याची खात्रीलायक माहिती सातारा वन परिक्षेत्र अधिकारी डॉ गो नी चव्हाण यांना मिळाली सदर ची माहिती वरिष्ठांना कळवून त्वरित एक टीम शिकऱ्यांना पकडण्यासाठी पाठवण्यात आली.
या वेळी जांबळेवाडी(कण्हेर) जवळ दोन जण प्लास्टिक चा पोत्यातून काहीतरी घेऊन जात असतात त्यांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता पोत्यात वन्यप्राणी चौसिंगा जखमी अवस्थेत आढळून आला, सदर शिकार व वन्यप्राणी बेकायदा वाहतूक प्रकरणी राजकुमार मारुती इंदलकर रा.कळंबे व नथु सखाराम करंजकर रा. जांभलेवाडी या दोघांना अटक करण्यात आली आहे

सदरचा कामी सातारा उपवनसंग्रक्षक श्री महादेव मोहिते यांचा मार्गदर्शना खाली सुधीर सोनावले सहा वनसंगरक्षक सातारा,श्री निवृत्ती चव्हाण वन परिक्षेत्र अधिकारी सातारा, कुशल पावरा वन परिमंडळ अधिकारी, वनरक्षक सुहास भोसले ,राज मोसलगी , मारुती माने,कायम वन मजूर गोरख शिरतोळे यांनी
कष्ट घेतले पुढील चौकशी काम सुरू करण्यात आले आहे
You must be logged in to post a comment.