वन्यप्राणी अवशेष विक्रीप्रकरणी कारवाई

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : आयुर्वेदिक औषध विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये इंद्रजाल वन्य प्राण्यांचे अवशेष आढळून आले होते. हे अवशेष बावडेकर दुकानाचा मालक अचल हंजे यांच्याकडूनच इतरांना पुरविले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वनविभागाचे विशेष तपासणी पथक आता हंजेच्या पुरवठादाराचा शोध घेणार आहे. दरम्यान, कोल्हापुरात या पथकाने तपासणी करून अचल हंजे याला चौकशीसाठी कऱ्हाडला बोलावले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, काही महिन्यांपूर्वी सांगली आणि सातारा जिल्ह्यातील काही दुकानांमध्ये वन्य प्राण्यांचे अवशेष आढळले. हे अवशेष वनविभागाने जप्त केल्यानंतर त्याचा पुरवठा कोल्हापूर येथील आयुर्वेदिक औषध विक्री करणारे अचल हंजे यांनी केल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने बावडेकर दुकानाची झडती घेतली तेव्हा वन्य प्राण्यांचे अवशेष आढळून आल्याने खळबळ माजलीहोती. त्यानंतर वनविभागाने बावडेकर यांची दुकाने काही महिनेबंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.

सातारा, सांगली आणि कोल्हापूर असे तिन्ही जिल्ह्यांमध्ये या कारवाईची व्याप्ती असल्यामुळे वनविभागाच्या स्पेशल इन्वेस्टिगेशन टीमची स्थापना करण्यात आली. या टीमचे प्रमुख साताऱ्याचे उपवनसरंक्षक महादेव मोहिते आहेत. यात कोल्हापूरचे वन्यजीवचे विभागाीय वनअधिकारी विशाल माळी, सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, सहायक वनसंरक्षक सुधीर सोनवले, सहायक वनसंरक्षक अजित साजणे यांचा समावेश  आहे. याच वनविभागतील पथकातील सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे गुरुवारी कोल्हापुरात बावडेकर दुकानाचे मालक अचल हांजे याच्या चौकशीसाठी कोल्हापुरात गेले होते. येथे अचल हंजेची कसून चौकशी केल्यानंतर पुढील अधिक तपासासाठी सोमवार, दि. ३१ जानेवारीला कऱ्हाड येथे बोलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

error: Content is protected !!