सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पळसावडे येथे वनरक्षक महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण करणार्या माजी सरपंचासह त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तक्रारदार सिंधू सानप आणि त्यांचे पती हे दोघे वनरक्षक असून 17 तारखेपासून संशयित आरोपींनी सलग दोन दिवस असलेल्या वनरक्षक महिलेला ‘मजूर का घेवून गेला?’ या रागातून त्रास दिला. 19 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता महिला वन रक्षक सानप आणि त्यांचे वनरक्षक पती सुर्याजी ठोंबरे हे काम करत असताना तेथे संशयित आरोपी पती-पत्नी आले आणि त्यांनी पुन्हा वाद घालत महिला वनरक्षक आणि त्यांच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली होती.
या प्रकरणी जखमी महिला वनरक्षक सिंधू बाजीराव सानप यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी या प्रकरणात रामचंद्र गंगाराम जानकर आणि प्रतिभा जानकर या दाम्पत्याना अटक केले. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 22 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
You must be logged in to post a comment.