सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरूणाला त्याच्या मित्रांनी बेदम मारहाण करून त्याला उकळत्या चुन्यात ढकलल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील रविवार पेठेत गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. यामध्ये संबंधित तरूण भाजून गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी. साताऱ्यातील रविवार पेठेमध्ये चुनाभट्टी असून, या ठिकाणीसमाधान मारे (वय २३) हा राहात आहे. तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. गुरुवारी सकाळी त्याची त्याच्या मित्रांसोबत शाब्दीक वादावादी झाली. यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. हा वाद रस्त्यावरच सुरू होता. त्याला मारहाण करत त्याच्या मित्रांनी समाधानला शेजारीच असलेल्या उकळत्या चुन्यात ढकललं. त्यानंतर संबंधित मित्र तेथून पसार झाले. त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर चुन्याने भरले. त्यामुळे अंगावर ठिकठिकाणी त्याला भाजले आहे. या प्रकारानंतर काही नागरिकांनी समाधान मोरेला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेकीखाली उपचार सुरू आहेत. समाधानचा त्याच्या मित्रांसोबत नेमक्या कोणत्या कारणातून वाद झाला, हे अद्याप पुढे आले असून, पोलीस समाधानचा जबाब नोंदवत आहेत. त्यानंतरच या मारहाणीचे कारण स्पष्ट होणार आहे.
You must be logged in to post a comment.