सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यानुसार आज सातारा शहरात देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडला.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. दिवसोंदिवस पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या भावात होणाऱ्या दरवाढीचा यावेळी निषेध करण्यात आला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा’, ‘मोदी हटाओ देश बचाओ’, अशा घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनाची भूमिका स्पष्ट करतांना राष्ट्रवादीचे सुनील माने यांनी सांगीतले की, गेल्या सहा महिन्यापासून पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल शंभरी पार, गॅस साडेआठशे रुपये असे दर वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले गेले आहे. वाढत्या महामागाईमूळे सामान्य नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. महामागाई, रोजगार कमी करणार, मोफत गॅस आदी भुलथापा देवून मोदी सरकार निवडून आले. जनतेला दिलेले आश्वासन पंतप्रधानांनी पुर्ण करावे. त्वरीत ही केलेली दरवाढ कमी करावी. अथवा पंतप्रधानांनी राजीनामा देवून सन्यांस घ्यावा अशी मागणीही माने यांनी आंदोलना दरम्यान केली.
You must be logged in to post a comment.