कुख्यात गुंड गजा मारणे पुणे पोलिसांच्या स्वाधीन

सातारा, भूमिशिल्प वृत्तसेवा : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे व त्याच्या साथीदारांना मेढा ता .जावळी या ठिकाणी शनिवारी रात्री पकडण्यात आले. त्यांच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांकडे एमपीडिए अंतर्गत दाखल कारवाई होणार असल्याने शनिवारी रात्री उशिरा मेढा पोलीस ठाण्याकडून त्याला पुणे येथून आलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासणी टीमच्या ताब्यात देण्यात आले.अशी माहिती मेढा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी दिली.

याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी गजा मारणे यांच्याविरोधात एमपीडिए अंतर्गत कारवाईचा केलेला प्रस्ताव मंजूर झाला होता.याची माहिती मारणे याला मिळाल्याने तो आपल्या साथीदारांसह पुणे येथून पसार झाला होता. पुणे ग्रामीण पोलीस याच्या मागावर होते .सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व वाई परिसरात याचे वास्तव्य आहे अशी पोलिसांना माहिती लागली होती. काल संध्याकाळी मेढा पोलिसांना मेढ्याजवळ घाटात क्रेटा गाडीच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या.यावेळी सपोनि अमोल माने यांनी गाडीतील सर्वांची तापासणी केली असता पुणे पोलिसांना हवा असलेला गजा मारणे यामध्ये असल्याची खात्री झाली.त्याला व साथी दारांना ताब्यात घेण्यात आले. पुणे पोलिसांकडे याच्यावर गुन्हे दाखल आहेत.यामुळे गजा मारणे व यांच्याबरोबर असणाऱ्या साथीदारांनाही शनिवारी रात्री पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईमुळे मेढा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने व सहकारी पोलीसांच्या कामगिरीचे समाजमाध्यमावर कौतुक होत आहे.

error: Content is protected !!