सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या चौदा जणांना वाई पोलिसांनी भीमनगर तिकटण्यात ताब्यात घेतले.हे सर्व जण पैशाच्या वसुलीसाठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.यातील काही लोकांचा पुण्यातील गज्या मारणे टोळीशी संबंध असल्याचे समजल्याने त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत.
राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या चौदा जणांना वाई पोलिसांनी भीमनगर तिकटण्याच्या तपासणी नाक्यावर दुपारी ताब्यात घेतले..हे सर्व जण पाचगणी व वाई येथील दोघांकडे पैशाच्या वसुली साठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले. वाई येथील बिल्डर व पाचगणी येथील एका शाळेच्या चालकाशी संबंधित पैशाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारातील वसुलीसाठी पुण्यातील हे चौदा जण तीन मोटारीतून वाईला आले होते.
पाचगणी येथे जाऊन व नंतर वाईत एकाच्या घरी जाऊन पुणे महाबळेश्वर रस्त्यावरील वाई भीमनगर तिकाटण्यातील तपासणी नाक्यावर त्यांच्या गाड्या अडविण्यात आल्या. पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे व कर्मचाऱ्यांनी त्यांना वाई पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती कळविण्यात आली आहे. त्यांच्या कडून दप्तर अहवाल मागविण्यात आला आहे. या चौदा जणातील अनेक जण गजा मारणे टोळी शी संबंधित असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांकडून समजली.या सर्वांकडे कसून चौकशी सुरू आहे.
You must be logged in to post a comment.