पोलीस करमणूक केंद्रासमोर नगरसेवक बाळू खंदारेचा राडा

I

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेेवा) : वाहन लावण्याच्या कारणावरून पोलीस करमणूक केंद्रासमोर खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी रात्री राडा झाला. याप्रकरणी नगरसेवक बाळू खंदारेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध दरोडा, हाफ मर्डरसह विविध कलमान्वये सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या राड्यात ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, या सर्व घटनेनंतर परिसरासह खासगी हॉस्पिटल बाहेर तणावाचे वातावरण आहे.

खासदार उदयनराजे भोसले समर्थक सनी भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील ऑफिससमोर गाडी लावली होती. त्यातून या नगरसेवकांच्या समर्थकांनी त्याला मारहाण केली. त्यामुळे संबंधित युवकाने त्याची गँग बोलावून तेथेच राडा केला. या राड्यात सहाजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची सातारा शहर पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून मारामारीत सहभागी असलेल्यां १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

बाळू खंदारे, आकाश नेटके, शुभम भिसे, शैलेश बडेकर, निखिल किर्तीकर यांच्यासह इतर अनोळखी ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सनी मुरलीधर भोसले (सर्व रा. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

संशयितांनी गुप्ती, रॉड, कोयता याचा हल्ल्यासाठी वापर केला असून पिस्टल चा धाक दाखवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा सर्व राडा राजपथावरील पोलिस करमणूक केंद्राच्या गेट परिसरात झाला आहे.

error: Content is protected !!