छ.शिवाजी कॉलेजची गार्गी साखरे थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा):दिल्ली येथील फील्ड मार्शल करीआप्पा परेड ग्राउंडवर होत असलेल्या अखिल भारतीय थल सेना कॅपसाठी शिवाजी कॉलेजची एन.सी. सी कॅडेट गार्गी साखरे रवाना झाली आहे.

एनसीसी भवन कोल्हापूर येथे जुलै २०२३ पासून ते १५ सप्टेंबर पर्यंत तीन महिन्याचे खडतर प्रशिक्षण घेऊन सलग आठ कॅम्पमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावीत गार्गी २२ महाराष्ट्र एन सी सी बटालियन साताराचे अखिल भारतीय स्तरावर दिल्ली येथे प्रतिनिधित्व करीत आहे.एनसीसीच्या लष्करी प्रशिक्षणात अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या ऑबस्टॅकल ट्रेनिंग प्रकारात ती महाराष्ट्राच्या टीम मध्ये कोल्हापूर ग्रुपचे प्रतिनिधीत्व करीत आहे.

२२ महाराष्ट्र बटालियनचे कमांडर, कर्नल दीपक ठोंगे प्रशासन अधिकारी, कर्नल नागेंद्र पिलाई, कंपनी कमांडर, लेफ्टनंट डॉ. केशव पवार, सुभेदार मेजर सतीश तपसे तसेच इतर आर्मी स्टाफ यांचे तिच्या प्रशिक्षणात मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल महाविद्यालयातून व समाजातील सर्व स्तरातून गार्गीचे अभिनंदन होत आहे. रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा. विकास देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे व प्राध्यापकांनी तीचे अभिनंदन करून पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!