रानगवा पडला विहिरीत

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : गेल्या काही दिवसांपासून जंगलातील प्राणी रस्त्यावर व मानवी वस्तीमध्ये येण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सोमवारी महाबळेश्वरमध्ये गवा विहिरीत पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी त्याला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरमधील लिंगमळा या परिसरात असणाऱ्या एका विहिरीत जंगली गवा कोसळला. या गव्याचे वजन तब्बल एक टन असल्याचे बोललं जात आहे. या घटनेनंतर वनविभाग आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या जंगली गव्याच्या तोंडात पाण्याच्या मोटारीच्या दोऱ्या अडकल्या आहेत. त्याचे वजन जास्त असल्याने त्याला क्रेनच्या मदतीशिवाय बाहेर काढणे अशक्य आहे. दरम्यान हा गवा विहिरीत नेमका कसा पडला, याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

error: Content is protected !!