सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचं आम्ही मानत नाही :बापट

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – सातारा जिल्ह्यात भाजपचे आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच आहे. त्यामुळे आम्ही साताऱ्याला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानत नाही, अशा शब्दात पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला.

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी गिरीश बापट साताऱ्यात आले होते. त्यांनी जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडून तालुकानिहाय ग्रामपंचायतींचा आढावा घेतला. राष्ट्रवादीच्या आमदारांनाकडे मोठ्या प्रमाणात पैसे असल्याने ते बिनविरोध निवडणूक आलेल्या ग्रामपंचायतींना बक्षीस जाहीर करीत आहेत. राष्ट्रवादी बिनविरोध निवडणून आलेल्या सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतात.

दरम्यान खासदार गिरीश बापट यांनी उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानी भेट दिली. यावेळी सुनील काटकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!