सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) ः वाई तालुक्यामधील सुरूर गावाच्या स्मशानभूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार पुण्यातील मांत्रिक व मुलीच्या नातेवाईकांकडून घडला आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर अल्पवयीन मुली, नातेवाईक आणि मांत्रिक यांनी पळ काढला.
मांढरदेव येथील काळूबाईच्या दर्शनासाठी येणारे भाविक दावजी पाटील मंदिरात येत असतात. सुरूर येथील गावातील धावजी पाटील या मंदिरात तांत्रिक मांत्रिक काही अघोरी प्रकार करत असतात. आज मंदिरापासून काही अंतरावरच असणाऱ्या स्मशानभूमीतील एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये अल्पवयीन मुली तिच्यासमोर विविध साहित्य मांडल्याचे दिसत होते. स्मशानभूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजन करत होता. यावेळी स्थानिकांनी त्यांना टोकले असता काही नाही अल्पवयीन मुलीला त्रास होत होता म्हणून हे करत आहे, फक्त कोंबडा मारुन नेणार आहोत असं एका महिलेने सांगितलं.
या व्हायरल व्हिडिओमुळे अंधश्रध्देचा प्रकार समोर आला आहे. या व्हिडिओ मध्ये अल्पवयीन मुलीची स्मशानभूमीतील पूजेवेळी मुलीच्या मांडीवर कोंबडा देवून तीला कुंकवाने काढलेल्या वर्तुळात बसवल्याचे दिसत आहे. तिच्या समोर बसलेला मांत्रिकाने मुलीसमोर लिंबु, अंडे, नारळ आदी साहित्य मांडून बसल्याचे दिसून येते आहे.
हा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहचताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक पोबारा झाले. याप्रकरणी भुईंज (ता वाई)पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक डॉ शीतल जानवे खराडे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक आशिष कांबळे करत आहेत.
You must be logged in to post a comment.