सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाबळेश्वरमधील एका मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याचे महिला दिनादिवशीच उघडकीस आले असून सबंधिताच्या मुसक्याही पोलिसांनी आवळल्या आहेत. तसेच मुख्याध्यापकावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव दिलीप रामचंद्र ढेबे (वय ५०) असे आहे. दिलीप ढेबे एका शाळेत मुख्याध्यापक असून संबंधिताने १५ वर्षांच्या विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याबाबत एका जागरूक नागरिकाने चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार दिली होती. महाराष्ट्र पोलिसांच्या या हेल्पलाईनवरून आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण चैकशीसाठी महाबळेश्वर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. मागील पाच दिवसांपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. त्यानंतर मुख्याध्यापक व पिडीत विद्यार्थीनीचा पत्ता महाबळेश्वर पोलिसांनी शोधून काढला. पोलिसांनी पिडीत मुलीला विश्वासात घेतल्यानंतर तिने सर्व माहिती दिली. पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक केली आहे. महाबळेश्वरचे पोलीस निरिक्षक बी. ए. कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
You must be logged in to post a comment.