साताऱ्याच्या विकासासाठी दोन्ही राजेंना मंत्रीपद द्या

भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. सुवर्णादेवी पाटील यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): केंद्रात खासदार श्री . छ.उदयनराजे भोसले यांना व राज्यामध्ये आ.श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्याची आग्रही मागणी करीत असल्याचे भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ.सुवर्णादेवी पाटील यांनी भाजपा वरिष्ठ पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सौ. पाटील यांनी नमूद केले आहे, संविधान बदलणे बाबतच अपप्रचार अल्पसंख्याकांमध्ये जाणीव पूर्वक निर्माण केलेले असुरक्षिततेचे वातावरण, आरक्षणावरुन निर्माण केला गेलेला संभ्रम, शेतकऱ्यांमधील नाराजी यांचा मोठ्या प्रमाणतील फटका लोकसभा निवडणुकीत भाजपा व महायुतीला बसला आहे. असे असून देखील मोदी लाटेत राष्ट्रवादीकडे असलेला सातारा मतदार संघ भाजपने खेचून आणला आहे. त्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सातारा विधानसभा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा आहे.

सातारचे राजघराणे हे शिवप्रभूचा वारसा सांगणारे असणारे समाजाच्या सर्व घटकात व स्तरात त्यांच्याबद्दल आत्मीयता आहे. व आपल्या सर्व समावेशक व विकासात्मक वृत्तीने कै.दादामहाराज, कै.आऊसाहेब महाराज, श्री. छ. उदयनराजे, श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ती जपली व वृद्धिगंत केली.या वेळचा मतदानाचा विचार केला तर गैरसमज व अपप्रचारातून शेतकरी, दलित बांधव, अल्पसंख्यांक समाज व मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती.

मतदानाच्या आकड्यावरून ते स्पष्ट झाले आहे की या सर्व समाजाला सोबत आणण्याची त्यांच्यातील गैरसमज दूर करण्याची क्षमता सातारच्या राजघराण्यात होती व आहे. मात्र काही अनाकलनीय कारणामुळे गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ या राजघराण्याला मंत्री पदापासून वंचित ठेवण्यात आले आहे.तरी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने वरिष्ठांकडे केंद्रात श्री. छ. उदयनराजे भोसले यांना व राज्यामध्ये श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्याची आग्रही मागणी करीत असल्याचे भाजपा प्रदेश सदस्या सौ. सुवर्णादेवी पाटील यांनी भाजपा वरिष्ठ पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

error: Content is protected !!