सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपरिषदेचा एकही पैसा न खर्च करता, सामायिक आरक्षण विकसित करण्याच्या प्रयत्नामधुन कै.दादामहाराज उर्फ कै.श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज बहुउद्देशिय संकूल गोडोली येथे उभारण्यात आले आहे. याचे उद्घाटन आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
सुमारे १०५०० स्के फुटाची वास्तु आणि तळमजल्याला पार्किंगची व्यवस्था असलेल्या इमारतीमध्ये एका मजल्यावर एमपीएससी युपीएससी स्पर्धा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित वास्तुचा सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रामुख्याने गोडोली व पूर्व भागातील नागरीकांना लाभ होणार आहे. सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातुन करण्यात आलेल्या व येणार असलेल्या गोडाली ते अजिंक्यतारा रस्त्यावरील बहुउद्देशीय सभागृहाचे लोकार्पण आणि विविध विकास कामांचा आणि भुमीपूजन समारंभ उत्साहात पार पडला.
सातारा नगरपरिषद लोककल्याण साधण्याचा विविध प्रकाराने प्रयत्न करीत आहे, क्षीरसागर यांनी सामाईक आरक्षण विकासित करताना, बांधुन दिलेल्या, नगरपरिषदेच्या मालकीच्या एकूण चार मजली इमारतीचे लोकार्पण होताना समाधान वाटत आहे. या इमारतीचा लोकांच्या साठी चांगला उपयोग होईल, याकामासाठी अँड डि.जी,बनकर व सहका-यांनी प्रयत्न केल्याने ही वास्तु आज दिमाखात उभी आहे.
या इमारतीच्या काही भागात स्पर्धा परिक्षा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने जरुर त्या सुविधा येथे उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्यामधुन युपीएसी परिक्षेसाठी फार कमी युवक पात्र ठरतात, त्यामुळे सातारा शहरासह या भागातील महाविद्यालयामधील युवकांसाठी आणि ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा परिक्षा केंद्राचा निश्चितच लाभ होणार आहे आणि असा लाभ घ्यावा असे आवाहन केले. इमारतीच्या उर्वरित भागाचा वापर समाजाच्या विविध कार्यक्रमांसाठी विनामुल्य करुन देण्याचा प्रयत्न आहे. ही इमारत नगरपरिषदेने उभी केली आहे, याची देखभाल व संरक्षण या भागातील नागरीकांनी करणे आवश्यक आहे असेही उदयनराजे यांनी सांगीतले.
या विविध लोकोपयोगी विकास कामांच्या समारंभाच्या ठिकाणी क्षीरसागर, बाळासाहेब ननावरे, अँड.विनित पाटील, गणेश चव्हाण यांचेसह त्या त्या प्रभागातील बहुसंख्य नागरिक, महिला भगिनी, मोठया संख्येने उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.