सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : प्रसिध्द उदयोगपती अनिल अंबानी कुटुंबियांसह सध्या महाबळेश्वरमध्ये मुक्कामाला असून त्या दररोज इव्हिनिंग वाॅकला दी क्लबच्या गोल्फ मैदानात जातात. दरम्यान, महाबळेश्वर नगरपालिकेने क्लबला नोटीस पाठविल्यानंतर टाळे ठोकले आहे. त्यामुळे या मैदानावर आता कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
कोरोनाचा वाढत्या संकटामुळे राज्यात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. अशा परिस्थितीमध्ये उद्योगपती अनिल अंबानी कुटुंबासह महाबळेश्वर येथे आले आहेत. अनिल अंबानी यांना रोज सकाळ आणि संध्याकाळी वाॅकसाठी बाहेर पडण्याची सवय आहे. अनिल अंबानी हे रोज सायंकाळी आपली पत्नी टिना अंबानीसह येथील गोल्फ मैदानावर वाॅक घेण्यासाठी येतात. याच मैदानात गावातील काही मोजकी मंडळी देखिल वाॅक साठी नियमित येत असतात. सध्या या मैदानावर अनिल अंबानी हे आपल्या पत्नीसह रोज वाॅक साठी येतात याची खबर शहरात पसरली त्यामुळे वाॅकसाठी जी काही मंडळी इतर ठिकाणी जात होती. त्यांनी आपली रोजची जागा बदलुन येथील गोल्फ मैदानावर वाॅक सुरू केला. त्यामुळे हळु हळु या मैदानावर वाॅकसाठी नागरीकांची गर्दी होवू लागली.
लाॅकडाउन मध्ये संचारबंदी असुन कोणालाही बाहेर पडता येत नाही असे नियम असतानाही उदयोगपती हे नियमित वाॅक घेण्यासाठी गोल्फ मैदानावर येतात. ही खबर पालिकेच्या मुख्याधिकारी यांना मिळाली त्यांनी तातडीने याबाबत खात्री करून घेवुन गोल्फ मैदानाची मालकी असलेल्या दि क्लब या संस्थेच्या सचिवांना नोटीस काढली.
पालिकेने बजावलेल्या या नोटीसीची दि क्लबने गंभीर दखल घेवुन नोटीस मिळतात तातडीने गोल्फ मैदानाला टाळे ठोण्यात आले आहे. तसेच ही नोटीस प्रवेश व्दारावर लावुन नागरीकांना आजपासुन हे मैदान बंद करण्यात आले आहे.
You must be logged in to post a comment.