दोन गुड न्यूज : झिरो पॉझिटिव्ह, 37 डिस्चार्ज !


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारकरांना आज (मंगळवारी) दिलासा देणार्‍या दोन ’गुड न्यूज’ मिळाल्या. एक म्हणजे दिवसभरात जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेले 37 जण आज (मंगळवारी) पूर्णपणे बरे होऊन आपापल्या घरी परतले. 
बेल एअर हॉस्पिटल (पाचगणी) येथील 8, श्रीमती सुशिला देवी साळुंखे गर्ल्स हॉस्टेल (पाटण) येथील 4, क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधासारण रुग्णालय (सातारा) येथील 1, सह्याद्री हॉस्पिटल (कराड) येथील 6, मेडिकल कॉलेज (मायणी) येथील 10, कोरोना केअर सेंटर (खावली) येथील 7 आणि रायगाव येथील 1 अशा एकूण 37 जणांना दहा दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली
पाटण : जांभेकरवाडी येथील 49 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवक, नवारस्ता येथील 46 वर्षीय महिला व घनबी येथील 62 वर्षीय महिला. वाई : किरोंडे येथील 25 वर्षीय पुरुष, आसले येथील 26 वर्षीय महिला व 3 वर्षे 5 महिन्यांची बालिका, कोंडावले येथील 47 वर्षीय पुरुष, धर्मापुरी येथील 23 वर्षीय पुरुष, जांभळी येथील 32 व 31 वर्षीय पुरुष आणि 25 वर्षीय महिला, आकुशी येथील 58 वर्षीय पुरुष, परतवडी येथील 29 वर्षीय व 50 वर्षीय महिला.  जावली : कळकोशी येथील 49 वर्षीय पुरुष. कराड : खराडे येथील 20 व 42 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष. कोरगाव : कटापूर येथील 28 वर्षीय पुरुष, शिरंबे येथील 27 वर्षीय पुरुष.  खटाव : वांझोळी येथील 18 व 54 पुरुष आणि अनुक्रमे 19, 39, 45 वर्षीय महिला, बनपुरी येथील 36 व 30 महिला, 13 वर्षीय युवक, 36 वर्षीय पुरुष व 15 वर्षीय युवक, चिंचणी येथील 21 वर्षीय युवक. सातारा : शेळकेवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, निगुड माळ येथील 43 वर्षीय महिला तसेच 21 वर्षीय व 52 वर्षीय पुरुष, रायगाव पोखरी येथील 50 वर्षीय पुरुष.
एकाचा मृत्यू पश्चात नमुना तपासणीसाठी रवाना 
सातार्‍यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात रात्री उशिरा खंडाळा तालुक्यातील भादवडे या गावातील 72 वर्षीय पुरुषाचा सारी या आजारावर उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. अनुमानित म्हणून त्याच्या घशातील स्त्रावाचा मृत्यू पश्चात नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या रुग्णाला चार वर्षांपासून मधुमेहाचा त्रास होता व त्यावर तो उपचार घेत होता.
152 जणांचे अहवाल निगेटिव्ह
एनसीसीएस (पुणे) यांनी 131 तर कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) यांनी 21 असे एकूण 152 नमुने अहवाल निगेटिव्ह असल्याचे कळविले आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.
129 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
सातारा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील 9, पानमळेवाडी येथील 7, शिरवळ येथील 19, कराड येथील 5, कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथील 22, वाई येथील 9, रायगाव येथील 7, मायणी येथील 33, बेल एअर (पाचगणी) येथील 1, पाटण येथील 9 व दहिवडी येथील 8 अशा एकूण 129 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस (पुणे) व कृष्णा मेडिकल यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
error: Content is protected !!