लसीकरणाला जेष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद ; शिवेंद्रसिंहराजेंनी मानले आभार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी लसीकरण युद्ध पातळीवर सुरु आहे. कोरोनावरील लस पूर्णपणे सुरक्षित आहे. शासनाच्या निकषानुसार साताऱ्यात लसीकरण सुरु असून लसीकरणाला जेष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणसाठी येणाऱ्या नागरिकांचे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आभार मानले आणि कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्वांनीच आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन नागरिकांना केले. 

भारतीय जनता पार्टीच्या सातारा शहर शाखेच्यावतीने कस्तुरबा गांधी रुग्णालय, सातारा जिल्हा रुग्णालय आणि गोडोली येथील आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी येणाऱ्या जेष्ठ नागरिकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी लसीकरण मोहिमेची पाहणी करून लस घेणाऱ्या नागरिकांची विचारपूस केली.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, उपाध्यक्ष राहुल शिवनामे, शहराध्यक्ष विकास गोसावी, उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रशांत जोशी, विलास कासार, दिलावर शेख पत्रेवाले, राजेंद्र चोरगे, नगरसेविका प्राची शहाणे, भाजप महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस मनीषा पांडे, शहराध्यक्ष रीना भणगे, शहर उपाध्यक्ष वैशाली टंकसाळे, सरचिटणीस हेमांगी जोशी, नेहा खैर, अश्विनी हुबलीकर, कुंजा खंदारे, दीपाली देशमाने आदी उपस्थित होते. 

आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी लसीकरणासाठी कष्ट घेणाऱ्या आरोग्य यंत्रणेचे आणि लस घेणाऱ्या नागरिकांचे  कौतुक केले. कोरोनापासून स्वतःचे, कुटुंबाचे आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे अत्यावश्यक आहे. शासनाच्या निकषास पात्र असणाऱ्या सर्व नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी आणि कोरोनाचे संकट थोपवण्यास हातभार लावावा असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. चंदन घोडके यांनी आभार मानले. 

error: Content is protected !!