सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकांचे गाव भिलारला भेट दिली.
भिलार येथे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना वाचनासाठी खूप चांगली पुस्तके ठेवण्यात आली आहे. भिलार हे आदर्श गाव असून या गावात आल्याचा आपणास आनंद झाला असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांना प्रकल्प कार्यालयात भिलार गावावरील माहितीपट दाखविण्यात आला.
प्रशांत भिलारे यांच्या मंगलतारा या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज गडकिल्ले शिवकालीन इतिहासावर आधारित पुस्तके ठेवण्यात आली आहे. येथेही राज्यपाल कोश्यारी यांनी भेट दिली.
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, उपजिल्हाधिकारी संगिता चौगुले, तहसिलदार सुषमा पाटील तसेच भिलार येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.