जिल्ह्यातील ६५० ग्रामपंचायतीमध्ये रणधुमाळी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींची मुदत झाली होती. त्याठिकाणी निवडणूक लागली होती. त्यापैकी दीडशेहून अधिक गावांना निवडणूक बिनविरोध करण्यात येत असून ६५० गावांमध्ये निवडणूक होणार आहे. अर्ज भऱण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील या लढतींचे चित्र स्पष्ट झाले. यापैकी बहुसंख्य गावांमध्ये दुरंगी व चौरंगी होणार आहे.

जिल्ह्यातील ८७६ ग्रामपंचायतीपैकी बहुतेक ग्रामपंचायती पूर्णता बिनविरोध तर काही अंशतः बिनविरोध झाल्या. जिल्ह्यतील ग्रामपंचायत निवडणुकीतील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये पाटण, माण, कोरेगाव, खटाव, कोरेगाव व वाई तालुक्यात चुरशीची निवडणूक होणार आहे. माण तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीपैकी १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.  सध्या ३३५ जागांसाठी ७२२ जण रिंगणात राहिले आहेत. फलटण तालुक्यातील ८० पैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. फलटण तालुक्यात ५७ ग्रामपंचायतीपैकी ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.  महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ४२ पैकी २८ गावांनी निवडणूक बिनविरोध झाली आहे.  पाटण तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीपैकी १८ गाव बिनविरोध झाली. खटाव तालुक्यातील ९० पैकी १३ गाव बिनविरोध झाल्या.  कराड तालुक्यातील १०४ गावांपैकी १७ गावे बिनविरोध झाली. उरलेल्या गावांमध्ये दुरंगी व तिरंगी लढत होणार आहे.

अर्ज माघार घेण्याच्या दिवशी उमेदवारांना लाखो रुपयांच्या तसेच विकास सेवा सोसायटीत संधी देण्याचे अमिष दाखवले आहे. ज्या गावांमध्ये निवडणूक होणार आहे. अशा गावातील ग्रामपंचायत आपल्या ताब्यात याव्यात यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यागावांमधील १६ तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!