सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) – सातारा जिल्ह्यामध्ये एकूण १४९६ ग्रामपंचायती असून त्यापैकी ८७९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकहाती वर्चस्व आहे. त्याच्याखालोखाल राष्ट्रीय काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांचा क्रम लागतो. तरीही प्रत्येक पक्षाच्यावतीने जास्तीत जास्त ग्रामपंचायत आपल्या ताब्यात कशा येतील, या दृष्टीने रणनिती आखली आहे
राज्यात एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेस यांची महाविकास आघाडी सत्तेवर आली. नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. सातारा जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका विविध राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढवणार का या निवडणुकीत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ग्रामपंचायतीच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या जाण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. परंतु ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर नव्हे तर स्थानिक गावातील गटातटाच्या राजकारणावर लढल्या जातात. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वेगळी समीकरणे असतात.
दरम्यान, सरपंच आणि सदस्य पदासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा असलेले तरुण किमान ७ वी पास तरी पाहिजेत, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. मात्र १९९५ च्या आधी जन्माला आलेला गावकारभारी जरी ‘अंगठा छाप’ असला तरी तो ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून येऊन सरपंचपदाचादेखील दावेदार ठरु शकतो.
पूर्वी निवडणुकीच्या आधीच सरपंच आरक्षण सोडत काढली जात होते. आधी आरक्षण सोडत काढल्याने अनेक गैरप्रकार होत होते. जातीची आरक्षण सोडत आधी निघाल्याने अनेकदा सरपंचपदासाठी जोरदार रस्सीखेच व्हायची त्यातून गैरप्रकार होत होती. काही ठिकाणी जातीचं बोगस प्रमाणपत्र घेऊन सरपंचपदाची निवडणूक लढवली जात होती. मात्र आता सरकारने ही आरक्षण सोडत निकालानंतर काढली जाणार असल्याचं जाहीर केली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा खर्च कोणी करायचा हा मोठा प्रश्न गाव पुढाऱ्यांपुढे पडला आहे. सरपंच आरक्षण अगोदर जाहीर झाल्यास सरपंच होऊ इच्छणारी व्यक्ती हा खर्च करीत होती. त्यामुळे यंदाची ग्रामपंचायत निवडणूक ही सर्वाधार्थाने अगळी आणि वेगळी ठऱणार आहे.
You must be logged in to post a comment.