६५२ ग्रामपंचायतींमध्ये आज मतदान

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – सातारा जिल्ह्यातील ६५२ ग्रामंपचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यासाठी २ हजार ४७ मतदान केंद्र उभारण्यात आले असून त्यासाठी १९ हजार ४६७ कर्मचारी राबवणार आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून या गावांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू झाली

सातारा जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्य निमित्ताने वातावरण ढवळून निघाले आहे. ग्रामपंचायतीमध्ये आपली सत्ता यावी, यासाठी दुरंगी, तिरंगी लढत होत आहे. यासाठी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी गावामध्ये लक्ष घातल्याने ही निवडणुक प्रतिष्ठेची होत आहे. अनेक गावांमध्ये भावाविरुध्द भाऊ, सून सासू, जावा-जावा अशी लढत होत असल्याने चांगलीच चुरस निर्माण झाला आहे.

निवडणुक आयोगाकडून सातारा जिल्हातील ८७८ ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. पण त्यापैकी २२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तीन ग्रामपंचायतीनी अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे ६५२ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होत आहे. २ हजार ३८ मतदान केंद्रावर आज सकाळी आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. सायंकाळी साडे पाच वजेपर्यंत मतदान प्रक्रिया होता. या निवडणुकीत कोरोना बाधित असलेल्या व्यक्तींनी सायंकाळी पाच नंतर मतदान करावयाचे आहेत.

error: Content is protected !!