सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – सातारा शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या ग्रेडसेप्रेटरचे काम पूर्ण झाले. या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी अचानक उद्घाटन उरकून टाकले. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून पुन्हा उद्घाटन घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दिली.
पोवई नाक्यावर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ग्रेडसेप्रेटर प्रकल्प हाती घेण्यात आला. यासाठी ७५ कोटी रुपये खर्च करण्यात आला. सध्या काम पूर्ण झाले असून वाहतूकीसाठी खुला करण्यात आला पंरतु बांधकाम पूर्ण असल्याचा दाखला मिळाला नाही. त्याचे उदयनराजे भोसले व नगरपालिकेच्यावतीने उद्घाटन घेण्यात आले असले तरी शासनाच्यावतीने पुन्हा उद्घाटन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमिंत्रित केले जाईल. त्यांच्या उपस्थित शासकीय कार्यक्रम होईल.
You must be logged in to post a comment.