सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरवासीयांसाठी स्वप्नवत व महत्वकांक्षी असलेला प्रकल्प छत्रपती शिवाजी महाराज ग्रेडसेपरेटरचे उदघाटन आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या भव्य प्रकल्पामुळे सातारा शहराची वाहतूक कोंडी सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
यावेळी उदनयराजे म्हणाले, हा ग्रेडसेपरेटर आजपासून जनतेच्या सेवेत आम्ही मोठ्या आनंदाने सुपूर्त करत आहोत. सातारकर व जिल्ह्यातील जनतेने आजपर्यंत दिलेले प्रेम व आशीर्वाद याची तुलना कोणत्याही गोष्टीशी आम्ही करू शकत नाही हेच प्रेम व आशीर्वाद आम्हास आपली मनोभावे सेवा करण्याची ताकद देते.
सातारा शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोवई नाका येथे ग्रेडसेप्रेटरचे काम हाती घेण्यात आले होते. पाऊणे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ग्रेडसेप्रेटरचे काम सुरू झाले होते. हे काम सुरू असताना शहरातील वाहतूकीमध्ये दर पंधरा दिवसाला बदल करण्यात आले होता. त्यामुळे पोलीस आणि होम गार्ड यांच्यावर ताण पडला होता. तसेच काम सुरू असताना पोवई नाका येथील व्यावसायिकांनाही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. परंतु विकासाचे काम होत असताना सातारकरांनी कोणत्याही स्वरुपाचा विरोध न दर्शवता काम होऊ दिले.
यामध्ये विविध अडचणी आल्या परंतु हे काम पूर्ण झाले. नगरपालिकेच्यावतीने आज उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी फिट कापून ग्रेडसेप्रेटर वाहतूकीसाठी खुला केला. या उद्घाटन सोहळ्यास साताराच्या नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, डी. जी. बनकर, निशांत पाटील, विजय बडेकर, राजू भोसले व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.