सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुरोगामी महाराष्ट्राचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी आज, शुक्रवारी सकाळी ठिक १० वाजता कराड येथील शाहु चौकाचा परिसर १०० सेकंद स्तब्ध झाला.
सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, नागरिकांनी आहे त्या ठिकाणी स्तब्धता पाळत शाहू महाराजांना आदरांजली वाहली.
राजर्षी शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शासनाने आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता १०० सेकंद स्तब्धता पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज सकाळी येथील शाहु चौकातील पुतळ्यास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पन करुन अभिवादन केले
You must be logged in to post a comment.