सदरबाजारमध्ये टोळक्याचा धुडगूस

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : येथील सदरबझारमध्ये बुधवारी रात्री एका गटाने हाणामारी, तोडफोड करत धुडगूस घातला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. दरम्यान, याप्रकरणी संशयितांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी जमावाने सातारा शहर पोलिस ठाण्याला घेराव घातला.

सदर बाजार येथे बेकायदेशीर दारु विक्री करणार्‍या एका टोळक्याने राडा केला. त्यामुळे परिसरात नागरिक भयभीत झाले. यातूनच टोळक्याने परिसरातील काही वाहनांची तोडफोड केली. हा सर्व प्रकार सुमारे अर्धा तास सुरु होता. तोपर्यंत सदरबझारमध्ये नागरिक हळूहळू एकत्र जमू लागली. त्यानंतर या टोळक्याने पळ काढला. नागरिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.

error: Content is protected !!