महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीचा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला आढावा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारा येथे 4 ते 9 एप्रिल 2022 दरम्यान होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीचा आढावा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.

या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, दिलीप पवार आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे चांगल्या पद्धतीने नियोजन करावे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील यांनी या बैठकीत स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंच्या निवास व्यवस्था, नाष्टा, जेवण व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना करुन पार्कींग व्यवस्था व अन्य इतर सोयी सुविधाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

error: Content is protected !!