माजी मंत्री महादेव जानकर यांना मातृशोक

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जगन्नाथ जानकर (वय ९२ ) यांचे आज वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले आहे.त्यांना एकूण तीन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. पळसावडे ता.माण येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

गुणाबाई जानकर यांचे मूळगाव धनगरवाडी हे होय. शिक्षण घेतलेले नसले तरी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांचा सांभाळ करून त्यांना उच्चशिक्षित केले.

महादेव जानकर यांच्या संघर्षाच्या काळात आईने त्यांना साथ दिली. मुलांनी शिक्षण घ्यावे,यासाठी त्यांनी प्रयत्न केले. महादेव जानकर हे मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्याच्या शेजारी निवासस्थानी राहण्याची संधी त्यांना मिळाली, त्यांच्या कष्टाचे चीज झाले,अशीच सर्वांनी भावना त्या वेळी व्यक्त केली होत्या.

error: Content is protected !!