सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : लोणंद येथील गोटेमाळ या ठिकाणी अवैधपणे गुटख्याचा साठा प्रकरणी लोणंद पोलिसांनी पावणे दोन लाखाचा मुद्देमालासह एकास अटक केली.
लोणंद पोलिस ठाणे हद्दीत अवैध गुटख्याचा साठा केल्याबाबतची माहिती लोणंद पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग सातारा यांना संपर्क करून त्यांच्यासह लोणंद पोलीसांनी गोठेमाळ येथे धाड टाकूण लोणंद येथे राहणाऱ्या सागर नाथाजी शिंदे रा. याच्या कडून १ लाख ८६ हजार रुपयांच्या विमल, आरएमडी व हिरा कंपनीचा गुटखा जप्त केला असून सागर शिंदे यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार करीत आहेत.
You must be logged in to post a comment.