सातारा शहरात पावणेतेरा लाखांचा गुटखा जप्त

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :सातारा शहर परिसरात महाराष्ट्रात विक्री व बाळगण्यास बंदी असलेला गुटखा विक्रीसाठी आलेल्या टेम्पोवे सातारा पोलिसांनी कारवाई करीत महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा पानमसाला वगैरे एकूण १२,८२,६४०/- रुपयेचा माल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यानी जिल्हयातील अवैध धंदे, स्फोटके, प्रतिबंधीत अन्न पदार्थ, हत्यांरांचा शोध इत्यादींचा घेवून संबधीतांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश यापुर्वी दिले होते. त्यानुसार दहशतवाद विरोधी कक्ष सातारा मार्फत जिल्हयात विविध ठिकाणी बारकाईने नजर ठेवून त्यामध्ये गुंतलेल्या इसमांचा तसेच इतर गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. दि.०४/१२/२०२१ रोजी सर्पोन श्री.साळुंके, पोना सागर भोसले व सुमीत मोरे यांना त्यांचे गोपनीय माहीती मिळाली की सातारा शहर परिसरात महाराष्ट्रात विक्री व बाळगण्यास बंदी असलेला गुटखा विक्रीसाठी टेम्पो मधून येणार आहेत अशी माहिती मिळाल्याने दहशतवाद विरोधी कक्षातील पथक सातारा शहर परिसरात सापळा लावून थांबले असता बुधवार नाका परिसरात लकडी पुलाजवळ एक इसम टेम्पो घेवून आला त्याकडे चौकशी ब तपासणी केलीस असता त्याचे टेम्पोमध्ये हिरा कंपनीचा पानमसाला व रॉयल ७१७ टोबॅको वगैरे सुमारे ३३२६४०/- रुपये किमतीचा प्रतिबंधीत माल रुपये ५५००००/- रोख रक्‍कम व वाहन असा एकूण १२,८२,६४०/- रुपये मुद्देमाल (गुटख्यास) ताब्यात घेतला.

error: Content is protected !!