साताऱ्यात 17 लाख रुपयांचा गुटखा जप्त

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :साताऱ्यातून 17 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. कर्नाटक हुन पुण्याकडे निघालेल्या ट्रकवर पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई केली

सातारा शहरातील एम. आय.डी. सी परिसरातून छुप्या मार्गाने कर्नाटक हुन पुण्याकडे निघालेल्या गुटख्याच्या टेम्पोवर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली. तब्बल 17 लाख रुपयांचा गुटखा आणि 10 लाखाचा टेम्पो असा एकूण 27 लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना अनेक राज्यातून छप्या पद्धतीने गुटखा विक्रिसाठी आणला जात आहे.

error: Content is protected !!