सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कासवंड, ता. महाबळेश्वर परिसरात रानगवे व इतर वन्य प्राण्यांनी हैदोस घातला असून विलास पवार यांच्या स्ट्रॉबेरी शेतात रानगव्यांच्या कळपाने अक्षरशः थैमान घातले आणि ऐन तोडणीस आलेल्या स्ट्रॉबेरी फळाचे तसेच रोपांचे आतोनात नुकसान केल्याची घटना घडली.
सध्या कोरोना आणि वातावरणातील बदलामुळे शेतकरी आत बट्यात आला असताना या वन्य प्राण्यांच्या संकटाने शेतकरी राजा अक्षरशः हतबल झाला आहे.सध्या कोरोनाचे संकट घोंघावत असताना शेतकरी राजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. या संकटाने आणि बदलत्या वातावरणाने स्ट्रॉबेरी उत्पादकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले आहे. बाजारपेठ ओपन झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी लागवडी वर भर दिला पण रानटी प्राण्यांच्या या आस्मानी संकटाने या शेतकऱ्यावर आता कर्ज काढून घातलेले पैसे आता मिळतील की नाही याची खात्री नसल्याने आत्महत्या करण्याचे विचार या शेतकर्यांचा मनात येत आहे.
विलास पवार यांच्या ऐक ऐकरावरील स्ट्रॉबेरीचे तसेच दोन एकर गव्हा मध्ये रान गव्यानी हैदोस घातला आहे. स्ट्रॉबेरीचे वंड नुकसान केले असून गहू तर सबंध शेत फस्त केले आहे. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वन्य प्राण्यांना केलेले नुकसान न भरून येण्यासारखे आहे. सध्या त्यांचा तोडणी होणार होती त्यातच या रान गव्यानी घातलेल्या हैदोसाने लाखो रुपयांचे नुकसान या शेतकर्यांचे झाले आहे.महाबळेश्वर तालुक्यात वन्य प्राणी रात्रीच्या वेळी उभी पिके फस्त करीत असून कळप च्या कळप या पिकांमध्ये रात्रीच्या वेळी हैदोस घालताना दिसत आहेत. त्यामुळे वन विभागाने या प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करून शेतकर्यांचे होणारे नुकसान थांबवावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. या शेतकऱ्याला नुकसानीची भरपाई मिळावी अशीही मागणी होताना दिसत आहे..
You must be logged in to post a comment.