सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्याला दोन आठवड्यात दुसर्यांदा गारपीठीचा तडाखा बसला असून, आंबा, डाळींब आदी फळबागांसह टोमॅटो, ढबू मिरची सारख्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या तडाख्यातून कसेबसे बाहेर पडत असताना निसर्गाने पुन्हा एकदा दणका दिल्याने शेतकरी वर्ग अक्षरश: हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने उषम्यामध्ये वाढ झाली आहे, पर्यायाने विहिरींची पाणी पातळी खोल गेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने सुरुवात केल्याने शेतकर्यांची पळापळ झाली आहे. सोमवारी काही भागात पाऊस झाला, मात्र मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास पावसाचे आगमन झाले. वादळी वार्यासह आलेल्या पावसाने शेतकर्यांना नेस्तनाबूत केले आहे.
मागील आठवड्यामध्ये कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरात झालेल्या गारपीठमुळे कांदा, कलिगंड तसेच इतर भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज झालेल्या गारपीठीमुळे ऊसासह टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात सर्वत्रपांढरी चादर तयार झालेली होती. सध्या पालक, मेथी, कोथींबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले, ही वेलवर्गीय पिके घेतली जातात. मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे पालेभाज्याच्या रानात पाणी साचल्याने या पिकांचे नुकसान झाले. तर जोराच्या वाऱ्याने वेलवर्गीय पिकांचे मांडवभूईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोरोनाच्या तडाख्यातून कसेबसे बाहेर पडत असताना निसर्गाने पुन्हा एकदा दणका दिल्याने शेतकरी वर्ग अक्षरश: हवालदिलझाला असून, शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
You must be logged in to post a comment.