सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : पुणे-बेंगलोर महामार्गावर एक विचित्र अपघात झाला आहे. ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. आनेवाडी टोल नाक्याजवळ लिंब खिंडमध्ये ही दुर्घटना घडली.
पुणे-सातारा महामार्गावर आनेवाडी टोल नाक्याजवळ साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कार चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटून तो पुढच्या ट्रकवर आदळला.
या विचित्र अपघातात लोखंडी सळई घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर पलटी झाला. यामध्ये चालक केबिनमध्येच सळईच्या खाली अडकला. बाहेर येण्यासाठी ट्रक चालक प्रयत्न करत होता, मात्र २० ते ३० टन वजनाचे लोखंडी सळई त्याच्या अंगावर पडल्याने तो त्याखाली दाबला गेला
जखमी ट्रक चालकाने मदतीची याचना केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि ट्रकमधील सळई दूर करून चालकाला बाहेर काढण्यात आले. हा अपघात आज (मंगळवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. लोखंडी सळई अंगावर पडल्याने त्याखाली दबलेल्या ट्रक चालकाच्या दोन्ही पायांना गंभीर जखम झाली आहे. उपचारासाठी त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
You must be logged in to post a comment.