हरिहरेश्वर बॅँकेत ३७ कोटींचा अपहार

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेचे संस्थापक संचालक नंदकुमार खामकर व २९ संचालकांंनी संगनमताने ११२ कर्जदारांच्या नावे बनावट कागदपत्रे व दस्तऐवज तयार करून ३७ कोटी ४६ लाख ८९ हजार ३४४ रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले.

याप्रकरणी जिल्हा विशेष लेखा परीक्षक विजय दत्तात्रय सावंत यांनी संबंधितांवर वाई पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर बॅँकेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

बँकेचे अध्यक्ष अजित खामकर, उपाध्यक्ष जगन्नाथ सावंत, संस्थापक संचालक नंदकुमार खामकर, संस्थापक संचालक वजीर शेख, संचालक मनोज खटावकर, प्रकाश ओतारी, विलास खामकर, चंद्रकांत शिंदे, विष्णूपंत खरे, अर्जुन खामकर, जनार्दन वैराट, किरण कदम, जयश्री चौधरी, जयमाला खामकर, गोविंद लंगडे, तज्ञ संचालक अरुण केळकर, अॅड. संतोष चोरगे, व्यवस्थापक रमेश जाधव, शाखा प्रमुख विनोद शिंदे, रणजीत शिर्के, सुनील पंजारी, वसंत सणस, रोखपाल सुचित जाधव, महेश शिंदे, दीपक शिर्के, तानाजी भोसले, सनदी लेखापाल राहुल धोंगडे, डी. बी. खरात, एन. एस. कदम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

error: Content is protected !!