सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या ३७ कोटी ४६ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे संस्थापक नंदकुमार खामकर यांना आर्थिक गुन्हे शाखेने आज अटक केली.मंगळवारी अटक केलेल्या पाच जणांना सात दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने २९ जणांवर गुन्हा दाखल असून याप्रकरणात पाच जणांना मंगळवारी अटक केली होती. रमेश ज्ञानेश्वर खामकर,ऍड ललित सूर्यकांत खामकर,ऍड अविनाश अशोक गाडे,तुषार सखाराम चक्के,अमोल खोतलांडे या सर्वांना न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. मुख्य संशयित बँकेचे संस्थापक नंदकुमार खामकर स्वतः मंगळवारी दुपारी सातारा येथील न्यायालयात हजर झाले होते. त्यांना आज न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले त्यांना अटक करण्यात आली असून गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक मोहन शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
You must be logged in to post a comment.